मुशाफिरी कलाविश्वातली
धुक्याचा इशारा
विन्स्लो होमर हा एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेला एक महान अमेरिकन चित्रकार. याची निसर्गचित्रं तर प्रसिद्ध आहेतच, पण याची अजरामर झालेली चित्रं आहेत ती समुद्राशी संबंधित असणारी चित्रं !! यातल्या बऱ्याचशा चित्रांमध्ये आपल्याला माणसाचं समुद्रातलं जीवन पहायला मिळतं.
विन्स्लोला कलेची आवड लहानपणापासूनच होती. खरंतर ही आवड त्याला आईपासून मिळाली होती. त्याची आई कलाकार होती. ती जलरंगातली चित्रं काढायची. चित्रकलेचं स्वतंत्र असं शिक्षण न घेताच तो 'illustrator' म्हणून कामाला लागला. २० वर्षांच्या illustrator च्या कामात त्यानं वेगवेगळ्या मासिकांसाठी लेखातल्या मजकुराला शोभतील अशी चित्रं त्यानं काढली.
वीस वर्षे व्यावसायिक काम केल्यानंतर होमरनं चित्रकलेचं शिक्षण घ्यायचं ठरवलं. त्याचं चित्रकलेतलं शिक्षण सुरू झालं. एकाच वर्षाच्या आत होमर उत्कृष्ठ चित्रं काढू लागला. त्याच्या आईनं पैसे जमवून त्याला युरोपमध्ये पुढच्या शिक्षणासाठी प्रयत्न केला. पण याच दरम्यान अमेरिकन नागरी युद्ध सुरु झालं आणि एका मासिकानं त्याला या युद्धात प्रत्यक्षात काय चाललं होतं ते (प्रत्यक्ष रणभूमीवर जाऊन) चित्रांमध्ये टिपण्याचं काम दिलं. तेंव्हा होमरनं युद्धातली दृश्यं, सैनिकांच्या आयुष्यातली दृश्यं, सैनिकांच्या आयुष्यातले निवांत क्षण, त्यांच्या आयुष्यातले कसोटीचे क्षण आपल्या रेखाटनांमध्ये अचूकरीत्या टिपले. युद्ध संपल्यानंतर त्यानं दैनंदिन जीवनातले प्रसंग दाखवणारी बरीच चित्रं काढलीत. या चित्रांमध्ये सुंदर स्त्रिया, लहान मुलं आणि त्यांच्या आयुष्यातले आनंदी आणि निरागस क्षण दिसायचे.
१८८१/८२ या काळात होमर इंग्लंडमधल्या समुद्रकिनाऱ्याजवळच्या एका छोट्याशा खेडेगावात राहायला गेला. त्याच्या २ वर्षाच्या या वास्तव्यात एक चित्रकार म्हणून त्याचा दृष्टिकोन खूपच प्रगल्भ होणार होता. इथल्या स्त्री-पुरुषांच्या आयुष्यातली काटकता त्याला भावली. त्याच्या चित्रांचे विषय आता बदलू लागले. उठावदार रंगांऐवजी तो आता काहीसे मवाळ प्रकारचे रंग वापरू लागला. तो आता मोठ्या आकाराची चित्रं काढू लागला. आशयपूर्ण चित्रं काढण्यावर आता तो भर देऊ लागला. त्याची ह्या काळातली सारी चित्रं फक्त जलरंगातलीच आहेत.
१८८२ च्या शेवटी होमर अमेरिकेत परत आला. त्याची चित्रं पाहून त्याच्या शैलीत झालेला बदल कलासमीक्षकांच्या पटकन लक्षात आला. बाहुल्यांसारख्या स्त्रियांऐवजी त्याच्या चित्रात आता काटक, न घाबरणाऱ्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या समर्थ अशा स्त्रिया दिसत होत्या.
१८८३ मध्ये होमर समुद्रकिनाऱ्यालगत राहायला गेला. त्याचं घर समुद्राला अगदी लागूनच होतं. या काळात होमर कोळ्यांसोबत समुद्रातही जायचा. आणि तिथं (जहाजावर) चारकोलचा वापर करून रेखाटनं करायचा. हे सारं करतांना कोळ्यांशी संवाद साधायचा, त्यांचं जीवन जवळून पाहायचा. समुद्राशी संबंधित त्यानं जी अजरामर चित्रं काढलीत ती ह्याच काळात. ह्या चित्रांमधलं एक महत्वाचं चित्र म्हणजे ‘धुक्याचा इशारा’ (The Fog Warning).

◆◆Image credit
Winslow Homer [Public domain]
https://commons.wikimedia.org/wiki/File:Winslow_Homer_-_The_Fog_Warning_-_Google_Art_Project.jpg
या चित्रात आपल्याला एक कोळी होडीत बसलेला दिसतो. मासे पकडण्यात त्याला यश मिळालंय. पण त्याचं लक्ष जहाजाकडं आहे. क्षितिजावरून धुकं येताना दिसतंय. एकदा का ह्या धुक्यात कोळी अडकला की दिशा समजणं निव्वळ अशक्य. म्हणून धुकं यायच्या आधी त्याला त्या जहाजापर्यंत पोहोचायचं आहे. समुद्राच्या लाटांमधून वाट काढत जहाजापर्यंत पोहोचणं हे एक कठीण काम आहे आणि इथं तर त्याला धुकं येण्यापूर्वी तिथं पोहोचण्यावाचून गत्यंतर नाही !! हे चित्र एक प्रकारची अस्वस्थता निर्माण करतं. चित्रातला कोळी जहाजापर्यंत पोहोचेल की नाही हा चित्र पाहणाऱ्याला प्रश्न पडतो.
काही वेळा आयुष्यात कठीण परीक्षेचे प्रसंग येतात. एखादा मोठा प्रॉब्लेम काही दिवसांच्या अंतरावर येऊन ठेपलेला दिसतो. या प्रॉब्लेममध्ये अडकलं तर आपण काही करू शकणार नाही ही धोक्याची घंटी आपल्या डोक्यात सतत वाजत असते. अशा वेळी आपल्याला काहीतरी मार्ग शोधायचा असतो. बऱ्याचदा या मार्गानं जाणं म्हणजे कठीण काम असतं, पण आपल्याला दुसरा पर्यायच नसतो. आपण शर्थीचे प्रयत्न करून त्या मार्गानं जायला सुरुवात करतो. आणि मग सुरु होते खरे नाट्य. एका बाजूला काळ पुढे चाललेला असतो आणि दुसऱ्या बाजूला आपण !! अशाच प्रकारचा मानसिक तणाव, एक प्रकारचं नाट्य चित्रकारानं ह्या चित्रात टिपलंय.
अमेरिकेतल्या शाळांमध्ये ह्या चित्राचा समावेश कलेच्या पुस्तकांमध्ये पाहायला मिळतो !
- दुष्यंत पाटील
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी
संदर्भ:
◆http://www.winslowhomer.org/the-fog-warning.jsp
◆https://www.mfa.org/collections/object/the-fog-warning-31042
◆https://en.wikipedia.org/wiki/The_Fog_Warning
No comments:
Post a Comment