Saturday, August 11, 2018

आशा

कुतूहल कलाविश्वातलं

आशा

बराक ओबामा राइट नावाच्या एका धर्मोपदेशकाच्या भाषणानं प्रभावित झाले होते. ते भाषण होतं "आशा" या विषयावर. या भाषणात त्या धर्मोपदेशकांनी "आशा" या चित्राचाही उल्लेख केला होता. राइट म्हणाले होते, "हिरोशिमामधला बळी असल्यासारखी या मुलीची वस्त्रं आहेत. पण तरीही तिच्यात आशा करण्याचं धाडस (audacity to hope) आहे." बराक ओबमांवर "आशा करण्याचं धाडस (audacity to hope)" या शब्दप्रयोगाचा खोलवर परिणाम झाला. त्यांनी आपल्या भाषणात हा शब्दप्रयोग वरचेवर वापरला. (नंतर त्यांनी audacity to hope ह्या नावाचं पुस्तकही लिहिलं.) बराक ओबामा यांचं "आशा" हे आवडतं चित्र.

चित्रामध्ये "आशे"च प्रतीक असणारी मुलगी एक वाद्य वाजवताना दिसते. ह्या आशेनं डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. एक प्रकारे वास्तव तिला दिसत नाही. तिच्या संगीत वाद्याच्या जवळपास सार्‍या तारा तुटल्या आहेत. वाद्यातली एकमेव तार शिल्लक आहे. ही आशा कान वाद्याच्या जवळ नेऊन संगीत वाजवत ऐकण्याचा प्रयत्न करत आहे. ही आशा पृथ्वीवर बसली आहे. स्वर्गाचं प्रतीक असणारा एक तारा आकाशात दिसतोय. एकूणच प्रकाशयोजना बऱ्यापैकी मंद आहे. वास्तव अंधुक आहे. चित्रातली निळसर करड्या रंगाची पार्श्वभूमी आर्तता दर्शावते.



काही लोकांच्या मते ह्या चित्राचं नाव "आशा" याऐवजी "निराशा" असं जास्त शोभलं असतं.

हे चित्र वॉट्सनं १८८६ मध्ये काढलं. चित्रकाराच्या दत्तक घेतलेल्या मुलीच्या एक वर्षाच्या बाळाच्या मृत्यूमुळं झालेलं दु:ख या चित्रातल्या दु:खी,  निराशाजनक भावांमधून प्रतिबिंबित होतं असं मानलं जातं. कसंही असलं तरी हे चित्र समीक्षक आणि लोकांच्या पसंतीसाठी उतरलं.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :

https://www.tate.org.uk/art/artworks/watts-hope-n01640

https://www.telegraph.co.uk/culture/art/3563194/Barack-Obamas-favourite-painting.html

https://mydailyartdisplay.wordpress.com/2012/05/21/hope-by-george-frederic-watts/

3 comments:

  1. अतिशय सुंदर चित्र आणि माहिती. निराशा नव्हे, आशाच आहे !!

    ReplyDelete
  2. निराशेचा काळोख कितीही गर्द असला तरी आशेचा एक किरण पुरेसा असतो. म्हणूनच या चित्रात नकारात्मक बाबी असल्या तरी त्यास 'निराशा' या नावापेक्षा 'आशा' हेच नाव समर्पक आहे.

    ReplyDelete
  3. suchitra katkarAugust 12, 2018 at 1:16 AM
    निराशेचा काळोख कितीही गर्द असला तरी आशेचा एक किरण पुरेसा असतो. म्हणूनच या चित्रात नकारात्मक बाबी असल्या तरी त्यास 'निराशा' या नावापेक्षा 'आशा' हेच नाव समर्पक आहे.

    ReplyDelete