Friday, July 27, 2018

अरबेस्क

कुतूहल कलाविश्वातलं

अरबेस्क

इस्लाममध्ये माणसे किंवा प्राणी यांची चित्रं काढणं यांना परवानगी नव्हती.. सर्वसाधारण ९ व्या /१० व्या शतकात कलाकार मंडळींनीं मग फक्त पानाफुलांचं (आणि कधी कधी त्यामध्ये त्यांच्या लिपीमधले शब्द टाकून, कधी कधी भौमितीय रचना टाकून) किचकट नक्षीकाम वापरून आपली कलाकुसर दाखवायला सुरुवात केली.. आणि यातून पुढे आला तो प्रकार म्हणजे -  अरबेस्क..

  या  अरबेस्कमध्ये काही पॅटर्न असतात.. ते शक्यतो अनंतता दर्शवणारे असतात.. उदा. एकाच झाडाच्या एकाच बुंध्यातून येणाऱ्या झाडाचं चित्र यात नसतं.. याउलट त्यामध्ये पुन्हा पुन्हा येणारे (म्हणजे सुरुवात आणि शेवट नसणारे, म्हणजेच एक प्रकारे अनंतता दर्शवणारे) पॅटर्न दिसतात.. या पॅटर्नमध्ये आपल्याला लयबद्धता दिसते.

दूरदूरच्या प्रदेशांमधली अरबेस्क ही जवळपास सारखीच असतात.. त्यांमध्ये इतके साम्य असते की अरबेस्क बघून ते कुठल्या प्रदेशातले अरबेस्क आहे हे सांगणं कुणालाही कठीण जावं..
हे अरबेस्क आपल्याला मशिदींवरच्या, वेगवेगळ्या इमारतींच्या कलाकुसरीमध्ये, तसेच गालिचे, कलाकुसर वापरून बनवलेल्या काचेच्या किंवा चिनी मातीच्या वस्तू, पुस्तकांमधले नक्षीकाम यामध्ये पाहायला मिळते.. इस्लामी कलेतील अरबेस्क हा एक महत्वाचा प्रकार आहे.
या अरबेस्कची काही उदाहरणे आपण पाहू या..


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी





 

No comments:

Post a Comment